Ad will apear here
Next
डॉ. बलदेवानंद सागर यांचे रत्नागिरीत व्याख्यान
६२व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन
डॉ. बलदेवानंद सागररत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एक व दोन मार्च २०१९ रोजी  कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे हे ६२ वे वर्ष आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पत्रकार, संस्कृतचे जाणकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे संस्कृत अनुवादक आणि प्रसारक डॉ. बलदेवानंद सागर यांचे व्याख्यान ऐकण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉ. सागर रत्ननगरीत येत असून, एक मार्चला ‘संस्कृत प्रसारमाध्यमे’ आणि दोन मार्चला ‘आधुनिक संस्कृतचे स्वरूप’ या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात ही व्याख्यानमाला होईल.

महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे वर्षभर नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात. यांपैकी कालिदास व्याख्यानमाला ही एक प्रदीर्घ परंपरा असणारी व्याख्यानमाला आहे. आजवर वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे निवृत्त कुलगुरू डॉ. अभिराज राजेंद्र मिश्र, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या निवृत्त कुलगुरू डॉ. उमा वैद्य, डॉ. प्र. के. घाणेकर, डॉ. इंदुमती काटदरे आदी मान्यवरांनी या व्याख्यानमालेचे व्याख्यातेपद भूषविले आहे. या वर्षी डॉ. बलदेवानंद सागर यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ संस्कृत रसिकांना मिळणार आहे.

डॉ. सागर यांनी आजवर आकाशवाणीसाठी ४४ वर्षे, तर दूरदर्शनसाठी २२ वर्षे संस्कृत वार्ता संपादन, प्रसारण आणि व्यवस्थापनाचे कार्य केले आहे. उज्जैनच्या कालिदास संस्कृत अकादमीचे ते संचालक आहेत. राष्ट्रीय नाट्यविद्यालय, एशियन अॅकेडमी ऑफ फिल्म्स अँड टेलीव्हिजन, नवी दिल्लीतील श्री लालबहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे ते अतिथी व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. सागर यांनी ‘दी ग्रेट मास्टर्स’ या दूरदर्शन मालिकेसाठी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दिल्ली येथे २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाच्या यशस्वी आयोजनातही त्यांचे मोलाचे योगदान होते. राष्ट्रीय दृष्टीबाधितार्थ संस्थानच्या ‘टॉकिंग बुक लायब्ररी’साठी त्यांनी संस्कृत साहित्याच्या ४०० ध्वनिमुद्रिकांचे, तसेच अन्य अनेक स्तोत्रांचे ध्वनिमुद्रण केले आहे. त्यांना काशीतील अखिल भारतीय विद्वत परिषदेचा ‘वाग्भूषणम् पुरस्कार’, वाङ्मयविमर्श, दिल्लीच्या चरवैति यांचा ‘उद्घोषणा– मर्मज्ञ पुरस्कार’, तर कानपूर येथील भारतीय चिंतक समाजतर्फे ताम्रपत्र व स्मृतिचिन्हाने देऊन सन्मानित केले आहे. संस्कृतशी निगडीत विविध विषयांवर त्यांचे विपुल लेखन आहे.

‘या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थी, संस्कृतप्रेमी आणि जाणकार रसिकांनी अवश्य घ्यावा,’ असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZJWBX
Similar Posts
रत्नागिरीत १६ मार्चला बावडेकर विज्ञान व्याख्यानमाला रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रति वर्षी विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेतील ३३वे पुष्प गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एम. के. जनार्दनम् गुंफणार आहेत.
‘गोगटे-जोगळेकर’च्या निसर्ग मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळातर्फे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० फेब्रुवारी २०१९ रोजी गावखडी येथील सरस्वती विद्यामंदिरमध्ये ‘समुद्री कासवांची जीवनशैली व त्यांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय रत्नागिरी : ‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू
‘पाच वर्षांत संस्कृतला आले अच्छे दिन’ रत्नागिरी : ‘देशात गेल्या पाच वर्षांत संस्कृतसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘आयआयटी’मध्ये वैकल्पिक विषय म्हणून संस्कृत शिकवतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही संस्कृत शिकवले जाते. तमिळनाडूमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंत संस्कृत शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील संस्कृत शिक्षकांनीही लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language